गणित भ्रष्टाचाराचं
(‘सोलावं वरीस
धोक्याचं’ च्या
चालीवर विडंबन)
राजकारणाच्या धंद्यामधलं
‘ग म भ न’ गरजेचं,
गणित भ्रष्टाचाराचं ग,
गणित भ्रष्टाचाराचं ग. ll धृ ll
घोटाळा केला टेलिकॉम चा,
पतंग उडविला स्पेक्ट्रम चा,
भ्रष्टाचाराचा आदर्श ठरलं
अजब डोकं राजाचं,
गणित भ्रष्टाचाराचं ग,
गणित भ्रष्टाचाराचं ग. ll १ ll
कॉमनवेल्थ च्या खेळांचा,
बाजार केला करोडोंचा,
कसं करावं कलमाडींच्या,
कौतुक सुपीक मेंदुचं,
गणित भ्रष्टाचाराचं ग,
गणित भ्रष्टाचाराचं ग. ll २ ll
ललित मांडी आय्.पी.ल्. चा,
तमाशा सारा पैशाचा,
बारामतीच्या मातीत उगवलं,
निबर कातडं गेंड्याचं,
गणित भ्रष्टाचाराचं ग,
गणित भ्रष्टाचाराचं ग. ll ३ ll
- सौरभ जोशी
टीप – वरील कवितेतील कुठल्याही व्यक्त्तीचे, नावाचे, स्थानाचे अथवा घटनेचे वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
No comments:
Post a Comment