Tuesday, March 31, 2020

मी सासुरवाशीण भोळी – गवळण


मी सासुरवाशीण भोळीगवळण
डोईवरी पाण्याचा घडा, मारु नको खडा,
नको रे वनमाळी
मी सासुरवाशीण भोळी. ll धृ. ll 

गवळणी घेती कटीवरी माठ लोण्याचे,
लांबून त्यावरी लक्ष जाई कान्हयाचे,
मग लपुन छपुन पळवितो गोळे लोण्याचे,
छेडितो, पदर ओढितो, घडे फोडितो,
कसा गं वनमाळी
मी सासुरवाशीण भोळी

करी रासक्रिडा गोकुळी यशोदाघरी,
जमवितो गोप-गोपिका यमुनातिरी,
कधी रंग खेळण्या हाती घेई पिचकारी,
करी ओली, नवी पैठणी, रंग उडवुनी,
वेडा गं वनमाळी
मी सासुरवाशीण भोळी.

कधी बसे वाजवित रानीवनी बासरी,
होतसे त्यास ऐकुनि राधा बावरी,
किती खेळ खेळितो कसा गं कृष्णमुरारी,
नाचतो, मना भुलवितो, लळा लावितो,
असा गं वनमाळी
मी सासुरवाशीण भोळी.

-- सौरभ जोशी (फक्त कडवी मी बांधली आहेत)


No comments:

Post a Comment