पहिले मीलन...
हसत लाजत जवळी आली
ती मीलनाची पहिली वेळ,
दोन तनांचा, दोन मनांचा
सहजचि जमला सुंदर मेळ.
नवे चुंबन अन नवे स्पर्श ते
दोन जीवांचे अतूट नाते,
नवाच गंध,नवेच नाते,
मग ह्रिदयाला स्पर्शुन जाते.
शुभ्र चांदणे नव पुनवेचे
आज तनुवर पांघरले,
प्रणयधुंद त्या ओठांवरती
ओले कुंतल ओघळले.
---- सौरभ आणि रेवती जोशी.
No comments:
Post a Comment