Tuesday, March 31, 2020

तिला बघितले....


तिला बघितले....

पहिल्यांदाच तिला पहिलं, अन् झाले कसे हाल,
घामाने थबथबला, माझा नवीन रुमाल.

वाटले तिच्यासवे जेवू, सोबत लावुनी कॅण्डल,
पण घाबरलो मी लगेच, पाहता तिची सॅण्डल.

घेतले मी पत्र लिहाया, पण विसरलोच लिपी,
होम्हणेल का ती? या विचाराने, वाढले माझे बी.पी.

मग करुनी धाडस मी, गेलो तिच्याकडे,
पण पाहुनी तिच्या बापाला, आले मला बुडबुडे.

पुढल्यावेळी घेउन गेलो, तिच्यासाठी मी कॅडबरी,
निमित्त शोधत बसलो होतो, बोलायाला काहीतरी.

लाडू सुंदर बेसनाचे, तिने मजला कैक दिले,
आणि म्हणाली परवा माझ्या, मुलाचे रे बारसे झाले.

- सौरभ जोशी


No comments:

Post a Comment