Tuesday, March 31, 2020

पुरे झाली महागाई - कोलावेरी च्या चालीवर


पुरे झाली महागाई - कोलावेरी च्या चालीवर
(ही कविता कोलावेरी गाणं जेव्हा प्रसिद्ध झालेलं तेव्हाची म्हणजे साधारण २०११ सालची आहे.)

पुरे झाली महागाई महागाई महागाई ही. ll धृ ll

लाखो टन धान्य सडत,
कांद्याचे भाव गगनाला भिडत,
गरिबांचे किती हाल होत,
सरकाराला तरी जाग नाही येत,
डोळ्यामध्ये पाणी आणी पाणी आणी पाणी आणी ही,
पुरे झाली महागाई महागाई महागाई ही. ll १ ll

डॉलर चालला चढत चढत,
रुपया आला घसरत घसरत,
Crude Oil नाही उतरत उतरत,
Import bill चालले फुगत फुगत,
पुरेल का भारताची गंगाजळी गंगाजळी ही,
पुरे झाली महागाई महागाई महागाई ही. ll २ ll

पेट्रोल च्या भावाचा भडका उडत,
Cooking ग्यास out of बजेट,
Meeting both ends तारेवरची कसरत,
मंत्री बसले खुर्च्या उबवत,
अजिबात लाज नाही चाड नाही कार्ट्यांना ही,
पुरे झाली महागाई महागाई महागाई ही. ll ३ ll 

आम जनता टयाक्स भरत,
खासदारांचे भत्ते वाढत,
राष्ट्रपती फक्त दौरे करत,
तिजोरीवर मोठा ताण पाडत,
किती मोठी बदमाशी बदमाशी बदमाशी ही,
पुरे झाली महागाई महागाई महागाई ही. ll ४ ll

-- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment