Tuesday, March 31, 2020

शरद ऋतु च्या निमित्ताने….

शरद ऋतु मधील चांदणं सर्वांनाच भुरळ घालतं. या चांदण्याचं यथोचित वर्णन एका संस्कृत श्लोकामधे माझे काका स्व. श्री. श्रीराम जोशी यांनी केलेलं आहे. तो श्लोक आणि त्याचा मी केलेला मराठी पद्यानुवाद देत आहे. या पद्यानुवादावरून मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ आपणास कळेल.

संस्कृत श्लोक (वृत्त मालिनी)
अनुपम सुखदात्री ग्रीष्मतापोपहंत्री,
जलधरजलधारा-शालिवर्षानुगंत्री, l 
नवकुसुममनोज्ञा तारका भास्वराया,
सकलभुवनगेया चंद्रिका शारदीया ll 
- स्व. श्री. श्रीराम जोशी

मराठी पद्यानुवाद (वृत्त सुमंदारमाला)
जगी सौख्य आनंद घेवोनि आली
उन्हाळी झळा दूर झाल्या झणी, l 
पहा येइ मागूनि वर्षा ऋतूच्या
दिसू लागते कृष्ण तारांगणी. ll 

नव्या पुष्परेखाहि तेजात न्हाती
नभी बैसतो गोल तेजोमणी, l 
सडे शिंपुनी शुभ्रशा कौमुदीचे
जगा मोहवी ही शरत् चांदणी. ll 

- सौरभ जोशी.

No comments:

Post a Comment