Tuesday, March 31, 2020

व्यथा

व्यथा 

वेदनांची वादळे ही आज वाहू लागली,
मन्मनीची स्पंदने ती लुप्त होउ लागली.

काय झाले, कोण जाणे, शोधितो मी उत्तरे,
सांग मजला आज का रे संथ झाले धुंद वारे?

मूक त्या संवेदना अन् ओल त्यातुन आटली,
भावनांची वेल माझी आज का कोमेजली?

तारांगणे नक्षत्र का भूमीवरी ही निखळली?
वाहणारी का नदी ही स्तब्ध येथे जाहली?

भास्कराची का दिसे निस्तेज मजला रे प्रभा?
पाखरांचे गे थवे का गुप्त झाले या नभा?

गात्र माझे गलित झाले अश्रु का मम आटले?
अंतरीचे स्वप्न होते निर्माल्य का ते जाहले?

--- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment